कोची (वृत्तसंस्था ) -येथे पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सामील झाली आहे.
भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. आज देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौकाआयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमधील कोची येथे हा सोहळा पार पडला. त्यानंतर आता भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत सामील झाली आहे.
पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. भारतीय नौदलाच्या स्वतःच्या संस्थेच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने युद्धनौका डिझाइन केली आहे. तर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कंपनीनं ही युद्धनौका तयार केली आहे.