जळगाव- जैनाबाद मक्का मस्जिद मधील मौलाना हाफिज कोनेन हे ३० एप्रिल रोजी रात्री तरावीह ची नमाज अदा करून आपल्या घरी गेंदालाल मिल येथे सायकलिने जात असताना आर्य हॉस्पिटल व भाजप कार्यालय यामध्ये दोन अज्ञात इसमांनी मोटरसायकलने येऊन मौलाना हाफिज कोनेन यांना पाठी मागून जोरात वीट फेकून मारली असता ते आपल्या सायकलीवरून पडले व थोड्यावेळासाठी बेशुद्ध झाले शुद्धीवर येऊन त्यांनी आपल्या मशिदीच्या विश्वास्तना बोलवून सदर प्रकार सांगितला परंतु सदर ट्रस्टींनी रात्री गुन्हा दाखल केला नाही.
रात्रीच मौलाना कोनेन यांनी घरी पोहचल्यावर सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख यांना फोन करून ही माहिती दिली असता त्यांनी त्वरित सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांना सदरची कल्पना दिली व त्यांनी उद्या सकाळी आपण तक्रार देऊ शकतात असे सूचित केले.
आज एक मे रोजी सकाळी मुफ़्ती अतीकुर्रहमान व फारुक शेख यांनी गेंदालाल मिल येथे जाऊन मौलाना हाफिज कोनेन यांची भेट घेऊन त्यांना आपल्या वाहनात शहर पोलीस स्टेशनला आणले. पोलीस निरीक्षक निकम यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली असता त्यांनी सदर प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करून घेतला.
भा द वी ३३७ व ३४ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३/२० अन्वये हा गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक भीमराव नांदुरकर हे पुढील तपास करीत आहे
मौलाना ची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यात गंभीर स्वरूपाचे जखम असल्यास अजून कलम ची वाढ करण्यात येईल असेसुद्धा पोलीस निरीक्षक निकम यांनी सांगितले.
पोलिसांनी केलेल्या त्वरित कारवाईमुळे उलेमा तंज़ीम चे मुफ़्ती अतीकुर्रहमान व मनियार बिरदारीचे फारुक शेख यांनी पोलिसांचे आभार मानले आहे.