जळगाव (प्रतिनिधी ) – राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकी असोसिएशन जळगाव व गोदावरी अभियात्रिकी महाविद्यालयातर्फे सोमवार, २९ ऑगस्ट रोजी २५ क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षीअशाप्रकारे २५ क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करणार असे गोदावरी फाउंडेशनचे सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, डॉ.प्रशांत वारके, डॉ.राजेश जाधव, क्रीडा संचालक आसिफ खान उपस्थित होते. क्रीडा शिक्षक / संघटक व्हिव्हियन रॉड्रीक्स व फारुक शेख यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले. तसेच प्रत्येक तालुक्यातुन एका क्रीडा शिक्षकाला पुरस्कार देण्यात आला. तसेच २३ शिक्षकांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच एक संस्था गोदावरी फाऊंडेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च महाविद्यालय जळगांव यांना चांगले कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेची पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमोच सूत्रंसचालन क्रीडा संचालक आसिफ खान यांनी तर आभार शफीकुरेमान अंसारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व हॉकी असोसिएशन जळगाव यांनी परिश्रम घेतले.