बॉयफ्रेंडच्या वादातून दोन मुलींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी ! ; बॉयफ्रेंडने केले पलायन
औरंगाबाद (वृत्तसंस्था ) – ‘एक फुल दो माली’ हि म्हण अनेकांच्या लक्षात आहे, मात्र इथे उलटेच असून ‘दोन फुल एक माली’ असा प्रकार उघडकीस आला असून एकावर प्रेम करणाऱ्या दोन मुलींनी आपल्या बॉयफ्रेन्डवर आपापला दावा करीत एकमेकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी केल्याची घटना घडली असून घटनेनंतर दोघांच्या बॉयफ्रेंडने दोन्हींचा रुद्रावतार पाहून त्या ठिकाणाहून पलायन केल्याची घटना घडली असून या घटनेची पैठण शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
पैठणमध्ये दोन मुली बस स्टँडजवळ एकमेकींना भिडल्या. या दोन्ही मुली एकाच मुलावर जीवापाड प्रेम करत होत्या. यातील एका मुलीने बॉयफ्रेंडसोबत दुसऱ्या मुलीला पाहिले तेव्हा तिचा राग अनावर झाला. सुरुवातीला दोन्ही मुलींमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका टोकाला गेला की, दोन्ही मुली भररस्त्यात एकमेकींना भिडल्या. या मुलींमध्ये मारामारी झाली हे पाहताच बॉयफ्रेंडनं त्याठिकाणाहून काढता पाय घेतला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. याठिकाणी मुलींची चौकशी करून त्यांना पुन्हा घरी पाठविण्यात आले . पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना गेल्या बुधवारी घडली. ज्यात सकाळी सकाळी बस स्टँडवर दोन मुलींमध्ये मारामारी होत असल्याचं पोलिसांना कळाले होते. या दोन्ही मुलीचा बॉयफ्रेंड एकच होता त्याचवरून दोन्ही मुली एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या.
या प्रकाराने बघेकरांचे मात्र मनोरंजन झाले.