यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चितोडा येथील तरूणाच्या हत्येमुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच पुन्हा एकदा महिलेच्या खुनाने तालुका हादरला आहे.
काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील चितोडा येथील तरूणाचा खून झाला होता. या गुम्ह्यात एका महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली हे आरोपी पोलीस कोठडीत आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. आज पुन्हा यावल तालुक्यात खुन झाल्याने नागरिक दहशतीत सापडले आहेत .
शहरातील परिसरात आज सायंकाळी उशीरा नाजीया जलील काझी ( वय ३५, रा. काजीपुरा) या महिलेवर कुर्हाडीने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात ही महिला गतप्राण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरात ही खबर वार्यासारखी पसरताच परिसर हादरला आहे. यावल येथील ग्रामीण रूग्णालयात डॉ. पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषीत केले आहे. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.