• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

‘ पन्नास खोके एकदम ओके’ लिहलेले १० हजार टि-शर्ट वाटा ;

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
‘ पन्नास खोके एकदम ओके’ लिहलेले १० हजार टि-शर्ट वाटा ;


 शिंदेंसोबतचे पाचही आमदार पराभूत होतील – डॉ. सतीश पाटील

जळगाव ( प्रतिनिधी ) – आगामी निवडणुकीच्या काळात ‘पन्नास खोके एकदम ओके’ लिहलेले १० हजार टि-शर्ट छापून ते मतदारसंघात वाटून द्यावे. असे झाल्यास जिल्ह्यातील शिंदे यांच्या सोबत गेलेले पाचही आमदार पराभूत होतील , या पाचही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील असा दावा डॉ. सतीश पाटील यांनी आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केला त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी जोरदार दाद दिली.

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी आजच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आगामी निवडणुकीसाठी ही अफलातून संकल्पना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासमोर मांडली

आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आज जिल्ह्यात आगमन झाले आहे. त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा जिल्हा मेळावा आयोजीत करण्यात आला याप्रसंगी बोलतांना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी आक्रमक भाषण करत काही मुद्देदेखील मांडले.

डॉ. सतीश पाटील म्हणाले की, राज्यात आपले सरकार असतांना काही पदाधिकारी सोशल मीडियातून नेत्यांसोबतचे फोटो शेअर करत होते. सरकार जाताच ते गायब झाले आहेत. सोशल मीडियापेक्षा प्रत्यक्षात काम करणे आवश्यक असल्याचे परखड मत त्यांनी मांडले. तसेच त्यांनी राज्यात सरकार गेले असले तरी लोकांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांमध्ये खूप रोष आहे. अगदी काल पोळा साजरा करतांना लोकांनी बैलांच्या अंगावर ‘पन्नास खोके एकदम ओके’ असे छापले असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

डॉ. सतीश पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मूळचे शिवसैनिक हे ठाकरे यांच्या सोबतच आहेत. आणि महाविकास आघाडी म्हणून आपण त्यांच्या सोबत आहोत. पुढील निवडणुकीसाठी पक्षाने मेहनत करून प्रचार करायचा आहे

आगामी निवडणुकीतील यशासाठी पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ‘राष्ट्रवादी संवाद यात्रा’ काढण्यात यावी अशी अपेक्षा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी पक्षाच्या मेळाव्यात व्यक्त केली. मुक्ताईनगर मतदारसंघात या यात्रेला प्रतिसाद मिळाला असून हा पॅटर्न जिल्ह्यात राबविण्याचे नाथाभाऊंनी सुचविले.

याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, आमदार एकनाथराव खडसे, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार मनीष जैन, माजी आमदार दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, एजाज मलीक आदीची उपस्थिती होती.


 

 

Tags: #dr.satish patil #jayant patil #parola #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

न्यायमूर्ती उदय लळीत बनले भारताचे ४९ वे सरन्यायाधीश

Next Post

एआयजीटीसीच्या राष्ट्रीय संघटक सचिवपदी भैय्या भामरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एआयजीटीसीच्या राष्ट्रीय संघटक सचिवपदी भैय्या भामरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon