जळगाव (प्रतिनिधी ) – नाष्टा देण्यावरून चार कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना जळगाव कारागृहात घडली असून चौघा कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोघे जखमी झाले आहेत.
२६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. सतीश मिलिंद गायकवाड, करण युवराज पवार, अर्जून युवराज पवार, विलास चंद्रसिंग पठाण असे कैद्यांची नावे आहेत. यातील सतीश गायकवाड हा मुलाखत विभाग येथून त्याच्या बॅरेक क्र. ४ कडे जात होता. त्यावेळी करण व बंदिवान कैदी विलास पठाण व अर्जून पवार यांनी सतीशला थांबवून त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर वाद उफाळून त्यांनी परस्परांना शिविगाळमारहाण केली. हा प्रकार तुरुंगाधिकारी यांच्या लक्षात येताच इतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हे भांडण सोडविण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.