जळगाव– जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव दारुगोळा कारखान्यात दोन सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा हल्ला झाला. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान, हा हल्ला कोणी केला? हे स्पष्ट झालेले नाही. पहाटेची वेळ साधून मद्य, गुटखा व तंबाखूची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेले अज्ञात व्यक्ती हल्लेखोर असावेत, असा अंदाज सुरक्षारक्षकांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे दारुगोळा निर्मिती कारखान्यातील सुरक्षेचा मुद्दा तर ऐरणीवर आलाच आहे, शिवाय कारखान्यात अवैधरित्या मद्य, गुटखा व तंबाखूची तस्करी होते का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.