पाचोरा(प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पारीमांडल्य महानुभाव आश्रम, श्री कृष्ण मंदिर, जामनेर तालुक्यातील मौजे शहापूर महानुभाव आश्रम व भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील महानुभाव आश्रम व इतर स्थावर मालमत्ता ही रविराज मुकुंदराज येळमकर यांच्या मालकीची असल्यावर ही भातखंडे येथील साधका शिष्य मोहन येळमकर यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व बनावट मृत्यूपत्र बनवून स्वताच्या नावे करुन घेतल्याबद्दल रविराज मुकुंदराज येळमकर यांनी फिर्याद दिल्यावरुन पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहन येळमकर रा. भातखंडे ता. भडगाव, विजय माधवराव बांधकर रा. मनसर, ता. रामटेक, जि. नागपूर, संतोष शेनफडु बडगुजर रा. वरसाडे, ता. पाचोरा, विनोद जयकृष्ण दर्यापूरकर रा. करनवाडी ता. मारेगांव, जि. यवतमाळ व नितीन पंडित कुलकर्णी रा. भवानी नगर, गिरडरोड, पाचोरा पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले .