जळगाव ( प्रतिनिधी ) – एमआयडीसीतील महावितरण सबस्टेशनसमोर व्यापारी कारचालकाला चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना २० ऑगस्ट रोजी रात्रीघडली या गुन्ह्यात पोलिसांनी अल्पवयीन मुलासह ६ संशयितांना अटक केली आहे. या संशयितांना २२ ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्वांना २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अमित बद्रीप्रसाद अग्रवाल (रा. अजिंठा सोसायटी ) हे २० ऑगस्ट रोजी रात्री एमआयडीसी एम सेक्टरमधील एमएसईबी ऑफिससमोर कारने जात असतांना दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली. दुचाकीवरील अनोळखी व्यक्तींनी अपघात झाल्याचा बनाव केला. नंतर या लुटारूंनी अमित अग्रवाल आणि त्यांचे वडील बद्रीप्रसाद अग्रवाल यांना मारहाण करुन व चाकुचा धाक दाखवून खिशातील दोन मोबाईल, डेबिट कार्ड, पॅनकार्ड काढून घेतले. चालकाचा मोबाईल आणि कारमधील २ लाख ४९ हजार ८०० रुपयाची रोकड बळजबरीने हिसकावून घटनास्थळावरून पोबरा केला. अमित अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
हा गुन्हा उमाळा व कुसूंबा येथील तरुणांनी केल्याची माहीती पो नि प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो ना किशोर पाटील, इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील, मुकेश पाटील, दिपक चौधरी, मुदस्सर काझी, साईनाथ मुंढे , चालक इम्तीयाज खान यांच्या पथकाने रात्रभरातच दिपक मोहीते वय २८, प्रथमेश कोलते वय १९, शुभम जाधव वय २२ ( तिन्ही रा. उमाळा ) , उमेश मोहीते, वय 22 , तेजस इंगळे वय २३ , कृष्णा पारधी वय २२,( तिघे रा. कुसूंबा ) या सहा संशयितांना अटक केली. त्यांनी गुन्हयात वापरलेली होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक जि.जे. 05 के वाय 1197 जप्त करण्यात आली आणखी अज्ञात 5 आरोपीचा शोध सुरु आहे.
सहा संशयिताना सोमवारी जिल्हा न्यायालयात न्या जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना २५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी काम पाहीले. पुढील तपास स पो नि अमोल मोरे व पो हे कॉ रतीलाल पवार करीत आहेत.