जळगाव (प्रतिनिधी ) – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी विमानतळावर आगमन झाले असता महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, दीपकसिंग राजपूत, सुनील महाजन , शरद तायडे गजानन मालपुरे आदींसह पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. पक्षाचे नेते आदेश बांदेकर, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत हे देखील उपस्थित होते
आदित्य ठाकरे यांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. अजिंठा चौफुली येथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत केले. आकाशवाणी चौक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर येथेच युवासेना आणि शिवसेनेच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महापौर जयश्रीताई महाजन यांनी त्यांना चांदीची तलवार भेट दिली.