पहूर(प्रतिनिधी) – विवाहितेला मारहाण करून दवाखान्यासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी छळ केल्याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील माहेर आलेल्या हेमांगी अमोल झाकरे (गुजर) यांचा विवाह सुरत येथील डॉ. अमोल दत्तात्रय झाकरे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती अमोल याने दवाखानासाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे अशी मागणी केली.
विवाहितेच्या तक्रारीवरून पती डॉ. अमोल झांकरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.