मुंबई (वृत्तसंस्था ) – पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना 1 ऑगस्टला अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी न्यायालयात झाली. यासाठी राऊत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. मेधा सोमय्या यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी संजय राऊत यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचं सांगितले आहे.न्यायाधीशांनी राऊत यांना व्हि़डिओ कॉनफरंसिंगद्वारे हजर करण्याचे निर्देश दिले. यानंतर राऊतांना विचारणा करण्यात आली की तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का? न्यायाधीशांच्या या प्रश्नावर उत्तर देत संजय राऊत यांनी हे आरोप अमान्य असल्याचे म्हटले .