दिल्ली (वृत्तसंस्था ) १०० हुन अधिक भोजपुरी गीते गाणाऱ्या गायकाजवळ २१ किलो गांजा आढळून आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
विनय शर्मा असे या गायकाचे नाव आहे. जो मूळचा बिहारमधील सिवानचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारकोटिक्स विभागाला ड्रग्स प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यामुळे नारकोटिक्स स्क्वॉडचे अधिकारी संदीप आणि एएसआय करण सिंह आपली टीम घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी फिल्मी स्टाईलने विनयला पकडलं. विनयची सध्या चौकशी सुरू आहे. त्याच्यावर इंदरपुरी इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून आणला आणि तो कुठे नेणार होता या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.