जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील आयएमएच्या जळगाव शाखेतर्फे रिमझिम गीरे सावन… या मेडीबीट्स अर्थात डॉक्टरांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात डॉक्टरांनी विविध चित्रपटातील गाणी सादर करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, डॉ. अनुराधा राऊत, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, अध्यक्ष डॉ. दिपक आठवले, सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे, सांस्कृतिक विभाग सचिव डॉ. प्रिती जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. दिपक आठवले, डॉ. नारायण आणि डॉ. माया आर्वीकर, डॉ. उदयसिंग पाटील, डॉ. राजेश पाटील, डॉ. मिलींद राणे, डॉ. राजेश जैन, डॉ. विद्याधर दातार, डॉ. दिपक अटल, डॉ. सुशीलकुमार राणे, डॉ. हेमंत केळकर, डॉ. शाहिद खान, डाॅ. शितल भोसले, डॉ. रुपाली बेंडाळे, डॉ.लीना नारखेडे, डॉ. संज्योगीता पाटील आदींनी विविध गीते सादर केली. त्यांना गिटार वर सादसंगत डॉ. तुषार बेंडाळे यांनी केली. सूत्रसंचालन व निवेदन डॉ. रितू कोगटा, डॉ. मनाली चौधरी व डॉ. दिपक अटल यांनी केले.
कार्यक्रमाच्या नियोजनात माजी सचिव डॉ. विलास भोळे यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी आयएमएच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.