जळगाव ( प्रतिनिधी ) – एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट नगरात ट्रक चालकाने ट्रक मागे घेत असताना तरूणाच्या डोक्याला गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी २४ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशफाक खान गुलजार खान (वय-३६) रा. इस्लामपुरा, भवानी पेठ जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे. अशफाक खान गुलजार खान हा ८ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता सुमारास एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट नगरामध्ये त्याचा आते भाऊ हुसेन खान यांच्या गॅरेजच्या दुकानावर पायी येत होता. त्यावेळी गॅरेज समोर टाटा ट्रक क्रमांक (एमएच १९ सीवाय ५३१०) वरील ट्रक चालकाने ट्रक मागे घेत असताना पायी चालत येत असलेला अशफाक खान गुलजार खान याला जोरदार धडक दिली. यात अशफाकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान १८ जुलै रोजी जखमी झालेला अशफाकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मयत अशफाकचा आतेभाऊ हुसेन खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी २४ जुलै रोजी दुपारी चार वाजता ट्रक क्रमांक (एमएच १९ सीवाय ५३१०) वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय निलेश गोसावी करीत आहे.