मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – तत्कालीन नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई झाल्यानंतर नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहिर झाला बहुमतात असलेल्या शिवसेनेच्या वतीने नगरसेवक पियुष मोरे यांनी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ यांना समर्थन दिलेले आमदार चंद्रकांत पाटील यांचे ते समर्थक आहेत.
राज्यातील सत्तासमीकरण बदलानंतर ते शिंदे गटाचे पहिले तरुण नगराध्यक्ष ठरल्याचा बहुमान त्यांना मिळेल . आमदार चंद्रकांत पाटिल यांचा नगराध्यक्ष मुक्ताईनगर नगरपंचायतीवर जवळपास विराजमान झालाच आहे औपचारिकरित्या अधिकृत घोषणा बाकी असल्याने आमदार चंद्रकांत पाटील समर्थक व शिवसैनिकांकडून आनंद व्यक्त होत आहे.
शिवसेना भाजप युती तोडल्याची अधिकृत घोषणा याच मतदारसंघातून झालेली असतांना भाजप शिवसेना युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम इथेच घडले.
पुढे महाविकास आघाडी पॅटर्न याच मतदारसंघात सर्वात अगोदर राबविला गेला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. महाविकास आघाडीने सत्तेचा अडीच वर्षाचा टप्पा पुर्ण केल्यानंतर महाविकास आघाडीचे आमदार असलेल्या मुक्ताईनगरात मिठाचा खडा टाकण्याचे काम याच मतदार संघातून केले गेले. त्यानंतर शिवसेनेतून उठाव झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान झाल्यावर शिंदे गटाचा पहिला नगराध्यक्ष याच मतदारसंघातून लाभत असल्याने याला चमत्कार म्हणावा की योगायोग .? असा प्रश्न विरोधकांना विचार करायला लावणारा आहे.