जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील एका भागात राहणारी २२ वर्षीय तरूणाला अज्ञात व्यक्तीने व्हॉटसॲपवर अश्लिल मॅसेज पाठवून खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका भागात २२ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी व्यवसाय करून आपल्या उदरनिर्वाह करते. ८ जुलै ते १६ जुलैच्या कालावधीत तरूणीला तिच्या व्हॉटस्ॲप क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने तिचे फोटो सोबत इतरांचे अश्लिल फोटो पाठविला. त्यानंतर सदरील फोटो सोशल मीडीयात व्हायरल करण्याची धमकी देवून खंडणीची मागणी केली. दरम्यान, अनोखळी व्यक्तीने तिचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल करून तिची बदनामी केली आहे. तरूणीने तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. तरूणीच्या तक्रारीवरून शनिवारी १६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.