जळगाव ( प्रतिनिधी ) – बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरणार्या संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्याला महिलेसह एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील डॉ. राहुल अग्रवाल (वय-२८) यांचे १२ जुलै रोजी दुपारी बसस्थानकातून पाकीट चोरीळ गेले त्यांनी जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली गस्तीवर असलेले पो ना जुबेर तडवी व अमित मराठे यांनी बसस्थानक गाठले. यावेळी एक अनोळखी इसम व महिला गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे पाकीट लांबवित असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी त्यांना सांगितले. त्यानुसार पोलीस कर्मचारी तडवी यांनी त्या इसमाची विचारपूस केली असता, त्याने तडवी यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात करीत त्यांना शिवीगाळ केली . तडवी त्याला समजविण्याचा प्रयत्न करीत असतांनाच त्याच्यासोबतची महिला पो ना जुबेर तडवी यांच्या अंगावर धावून आली. या झटापटीत जुबेर तडवी यांचा शर्ट फाटला.
पो ना तडवी यांनी घटनेची माहिती तात्काळ पो उ नि गणेश देशमुख यांना दिली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले . मारहाण करणाऱ्यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणले. गणेश चंद्रकांत आठवले (वय-३२, रा. शिवाजी नगर, जळगाव) व सरला पितांबर ठाकूर (वय-२१, रा. विजयनगर, नाशिक) अशी दोघांची नावे चौकशीत समोर आले दोघांनी डॉ. राहूल अग्रवाल यांच्या खिशातून पाकीट चोरले असून ४ हजार ५०० रुपये चोरी झाले पो ना जुबेर तडवी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.