जामनेर ( प्रतिनिधी ) – भाजप नेते आमदार गिरीश महाजन :आणि जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते आज शेंदूर्णीत त्रिविक्रम महाराज यांची पूजा करण्यात आली .
खान्देशचे प्रति-पंढरपुर शेंदुर्णी नगरीत भगवान श्री. त्रिविक्रम महाराज यांच्या मुर्तीस अभिषेक व महापुजा माझ्या हस्ते करण्यात आली. यंदा पाऊस समाधानकारक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सुखी , समाधानी व्हावा, यंदा शेतात मोठ्या प्रमाणावर पिक यावे, सर्वांना समाधान लाभावे अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे आमदार गिरीश महाजन :आणि जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनी सांगितले .
भगवान श्री. त्रिविक्रम महाराजांचे तीन प्रहरात दर्शन घेतले तर साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे पुण्य लाभते , अशी उत्तर महाराष्ट्रातील भाविकांची आणि वारकऱ्यांची श्रद्धा आहे दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी शेंदुर्णीत येत असता