जळगाव ( प्रतिनिधी ) – जळीत रुग्णांसाठी आयुष्याची नवी संजीवनी ठरणाऱ्या जळगावातील भाग्या बर्न केअर सेंटरची सुरुवात झालेली आहे

भाग्या बर्न केअर सेंटर हे जळगावातील एकमेव सुपरस्पेशालिस्ट बर्न केअर हॉस्पिटल ठरणार असून येथे प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन डॉ श्रीराज महाजन व डॉ जितेंद्र कोल्हे हे रात्रदिवस रुग्णसेवेसाठी उपलब्ध रहाणार आहेत . हे सुपरस्पेशालिस्ट बर्न केअर हॉस्पिटल सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज
राहणार असून कितीही तीव्रतेचा जळीत रुग्ण असला तरी स्वतंत्र आपत्कालीन उपचार कक्षात त्यांना आवश्यक ते उपचार अचूक निदान करणाऱ्या उपकरणांच्या मदतीने मिळणार आहेत . रुग्णांच्या शरीराच्या भाजलेल्या किंवा जळालेल्या भागाच्या फेररचनात्मक शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत . त्यासोबतच स्वतंत्र प्लस्टिक सर्जरी युनिटमध्ये जळालेल्या अवयवांची पुनर्बांधणी शक्य होणार आहे .
जळगावात भासकर मार्केट परिसरात जिल्हा पेठ पोलीस ठाण्याजवळ असलेल्या या भाग्या बर्न केअर सेंटरशी संपर्क साधण्यासाठी रुग्णांनी ०२५७ – २२४२२१८ / ९२८४७६०७०० हा क्रमांक उपलब्ध असल्याचे डॉ डॉ श्रीराज महाजन व डॉ. जितेंद्र कोल्हे यांनी सांगितले.







