जळगाव ( प्रतिनिधी ) – तरसोद येथील ४० वर्षीय तरूणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केली नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अनिल श्रीराम पाटील (वय-४०) असे मृत तरूणाचे नाव आहे.
अनिल पाटील पत्नी आणि दोन मुलींसह वास्तव्याला होते . मजूरी करून उदरनिर्वाह करत होते . पत्नी सुनिता देखील त्याचा हातभार लावत होती. परिस्थितील हालाखीची असल्याने त्यांच्या दोन्ही मुली पारोळा तालुक्यातील खराडी येथे मामाच्या गावाला शिकायला होत्या. तरसोद येथे घरी दोघेजणच होते. रात्री उशीरा अनिल पाटील व पत्नी सुनिता हे जेवण करून झोपले. मध्यरात्री अनिल पाटील याने घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याच ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास लक्षात आले. त्यांच्या आत्महत्येचं कारण लगेच कळू शकलं नाही. नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.