जळगाव ( प्रतिनिधी ) – पूर्ववैमनस्यातून हाणामारी राजीव गांधी नगरात झाली तिघांनी एकाच्या डोक्यात रिकामी बियर बॉटल मारुन जखमी करण्यात आले रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली .
राजीव गांधी नगरात रहिम सिकंदर पठाण (वय-३५) कुटूंबीयांसह वास्तव्यास असून मजुरी करुन उदनिर्वाह करतात. २८ जून रोजी रात्री भांडण उकरुन काढत रहिम पठाण यास फिरोज खान याने शिवीगाळ करुन चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यास आलेल्या रहिमच्या बहिणीला नादिरा शेख हिने पोटावर चावा घेतला तर, सद्दाम शेख याने रिकामी बियर बॉटल डोक्यात मारुन जखमी केले. जखमीवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर पोलिसांनी नोंदवुन घेतलेल्या जबाबावरुन रामानंदनगर पोलिसांत तिघा संशयीतांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.