जळगाव ( प्रतिनिधी ) – अ.भा.जिवा सेनेच्या युवक प्रदेश अध्यक्षपदी देविदास फुलपगारे यांची निवड करण्यात आली आहे .
सोमवारी संत सेना नाभिक समाज कार्यालय भुसावळ येथे अखिल भारतीय जिवा सेना प्रदेश कार्यकारिणी , उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी व जिल्ह्यातील समाज बांधवांच्या उपस्थितीत बैठक झाली राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगांवकर , कार्याध्यक्ष राजकुमार गाजरे , प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले, प्रदेश सचिव साहेबराव शेळके, प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले, उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष सुधिर महाले , कर्मचारी संघटनचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चौधरी , जिल्हासचिव प्रा.डॉ.नरेंद्र महाले, सचिन सोनवणे , महिला जिल्हाध्यक्षा कोकीळा चित्ते , भुसावळ महिला तालुकाध्यक्षा अनिता आंबेकर पंडीत बोरनारे व सर्व पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थीत होते
या वेळी जळगांव जिल्हाध्यक्षपदी न्हावी ( ता.यावल ) येथील किशोर श्रीखंडे यांची व जिल्हासचिव म्हणुन प्रा.डॉ.नरेंद्र महाले यांची फेरनिवड करण्यात आली कर्मचारी जिल्हाध्यक्षपदी अनिल जगताप, कर्मचारी जिल्हा कार्याध्यक्षपदी अनिल चौधरी , युवक जिल्हाध्यक्षपदि अनिल टोंगे , कार्मचारी जिल्हा सचिव संतोष रेलकर, जिल्हाकार्याध्यक्षपदि गणेश सेठी , जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश झुरके, राहुल जगताप , जिल्हा समन्वय समिती प्रमुख सुरेश ठाकरे , युवक जिल्हा उपाध्यक्ष मनोज सुर्यवंशी, प्रविण हातकर, जिवन बोरनारे यांची रावेर तालुकाध्यक्ष म्हणुन फेरनिवड व उमेश निंबाळकर यांची रावेर तालुका युवक अध्यक्ष म्हणुन , उदय सोनवणे यांची यूवा जिल्हा खजिनदार म्हणुन, भुसावळ तालुका अध्यक्ष भिका बाणाईत, जिल्हा संघटक रवि अहिरकर , चोपड्याचे जिल्हा संपर्क प्रमुख दिनेश जगताप यांची फेरनिवड करण्यात आली.