पारोळा ( प्रतिनिधी ) – इलेक्ट्रिक मोटर चोरून येणारे तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली
फिर्यादी सोमा महाजन यांचे घराचे बांधकाम चालू असून एक हॉर्स पावरची इलेक्टरीक पाण्याची ओरियन्ट कंपनीची मोटर घेऊन जाताना 3 चोरटे त्यांना त्यांचे घराजवळ दिसले त्यांनी त्यांची इलेक्टरीक मोटर ओळखली असलेने त्यांनी त्यांचा नातू लोकेश महाजन ईश्वर पाटिल, समाधान महाजन यांना बोलावले आणि चोरट्यास विचारपूस केली छोटू ठाकरे याने लोकेश महाजन यास मारहाण केली सोबतचे आरोपी आत्माराम पाटील व आत्माराम महाजन हेसुद्धा फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत होते तेवढ्यात गस्तीवरचे पोलीस किशोर पाटील, संदीप सातपुते, अभिजित पाटील यांना गर्दी दिसलेने तेथे गेले पोलिसांनी तिन्ही आरोपीस कोयत्यासह व चोरलेला मोटारसह ताब्यात घेतले फिर्यादीचे फिर्यादवरून गुन्हा दाखल केला असून -चोरलेली 6000/-रुपयांची इलेक्टरीक मोटर जप्त केली आहे, तिन्ही आरोपींना अटक केली आहे, पो ना योगेश जाधव पुढील तपास करीत आहेत.