जळगाव ( प्रतिनिधी ) – तक्रारदाराच्या मुलीने सासरच्या लोकांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदतीसाठी ४ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या चाळीसगावच्या सहाय्यक फौजदाराला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे .
तक्रारदार चाळीसगांव येथील रहिवाशी आहे. आरोपी अनिल रामचंद्र अहीरे ( वय-५२, सहाय्यक फौजदार, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ) व शैलेष आत्माराम पाटील ( वय-३८,पोलीस नाईक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ) अशी आरोपींची नावे आहेत . या आरोपींनी आधी ५ हजार रुपयांची मागणी केली होती . नंतर ४ हजार रुपयात तडजोड झाली होती . २८ जून रोजी ही कारवाई करण्यात आली
तक्रारदार यांच्या मुलीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे त्यांचे सासरच्या मंडळी विरुद्ध गु.र.नं.0113/2022 भादवि कलम-४९८ अ व इतर कलमान्वये 19/03/3022 रोजी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करू असे सांगून चार्जशीट लवकरात लवकर पाठवुन गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आरोपींनी पंचासमक्ष 4,000/- रुपये लाचेची मागणी केली व शैलेष पाटील यांनी त्यास प्रोत्साहन दिले लाचेची रक्कम दोन्ही आरोपी हजर असतांना सहाय्यक फौजदाराने स्वतः चाळीसगाव शहरातील सिग्नल पाईंटजवळील एका चहाच्या टपरीवर पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील , पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव होते पो नि संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर , प्रदिप पोळ. यांच्या पथकाने ही कारवाई केली .