जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात सामाजिक कामांसाठी छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे .
छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रविण मोरे आहेत त्यांनी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर जाहीर करीत राज्य उपाध्यक्षपदी अमोल पाटील तर सचिवपदी निलेश मराठे यांची निवड.केली आहे .
छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानच्या माध्यमातून गाँव तेथे शाखा व घर तेथे मावळा जोडण्याचे कार्य हाती घेतले जाणार आहे, गडसंवर्धन , शिवकार्य, सामाजिक कार्यासाठी छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान सदैव कार्यरत राहणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकारी यांनी सांगितले.