जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील विवाहितेचा हुंड्याच्या पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
ममुराबाद येथील मूळ रहिवासी माधुरी मुकेश शिंपी (वय – २५) ह्या हल्ली जळगाव शहरातील आनंदमंगल सोसायटी येथे राहायला आहे. माधुरी यांचा जामनेर तालुक्यातील पालधी येथील मुकेश हेमंत शिंपी यांच्यासोबत विवाह झाला आहे. १६ एप्रिल २२ आजपावेतो माधुरी यांचा त्यांचे पती यांच्यासह सासरच्या मंडळींनी हुंड्याच्या पैशांवरून वेळोवेळी शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करत मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली हा त्रास असह्य झाल्याने माधुरी या त्यांच्या माहेरी जळगाव शहरातील आनंदमंगल सोसायटी येथे निघून आल्या. व याप्रकरणी गुरुवार 23 जून रोजी माधुरी शिंपी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती मुकेश शिंपी , सासरे हेमंत नामदेव शिंपी, सासू आशाबाई हेमंत शिंपी, मामसासरे कैलास आत्माराम कापुरे, मामसासू ज्योती कैलास कापुरे सर्व रा.पाळधी ता.जामनेर या पाच जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार श्रद्धा रामोशी ह्या करीत आहेत.