औरंगाबाद (वृत्तसंस्था) – शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी पुन्हा नव्या 14 रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या ही 144 वर पोहोचली आहे. यामुळे औरंगाबादकरांची चिंता चांगलीच वाढली आहे.
भीमनगर 6, किलेअर्ल 1, असेफिय 2, नूर कॉलनी 1, कैलासनगर 1, चिकलठाणा 1, सावरकर नगर 1, घाटी 1 या ठिकाणी हे नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे आता औरंगाबादकरांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 144 वर गेली आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 144 वर गेला असून आतापर्यंत 23 रुग्ण या आजारातून बरे झाले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढीमुळं औरंगाबाद शहरात संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अत्यावश्यक कामानिमित्त जर घराबाहेर पडायचे असल्यास मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे.