जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात माहेर असलेल्या विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरुन तीन लाख रुपये आणावेत या कारणावरून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात दिव्या ज्ञानेश्वर मोहोटे (वय २३) यांचा पुणे जिल्ह्यातील संगमनेर येथील ज्ञानेश्वर मधुकर मोहोटे यांच्या सोबत विवाह झाला आहे. सद्यस्थितीत दिव्या मोहोटे या आळंदीला राहतात. दिव्याने आळंदीचे घर घेण्यासाठी माहेरुन तीन लाख रुपये आणावेत या कारणावरून पती ज्ञानेश्वर मोहोटे व सासु अलका मोहोटे यांनी दिव्या हिस वेळोवेळी शिवीगाळ करत मारहाण केली व शारीरिक व मानसिक छळ केला. यास मामसासरे यांनीही प्रोत्साहन दिले. अशा दिव्या हीने दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी ज्ञानेश्वर मोहोटे व सासु अलका मोहोटे व मामसासरे अरुण पंढरीनाथ फरगडे तिन्ही रा. संगमनेर जि. पुणे यतीन अनुरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.