जळगाव ( प्रतिनिधी ) – यंदा आज पहिल्यांदा आलेल्या अर्ध्या तासाच्या पावसात विद्युत खांबाचा शॉक लागून गाय दगावल्याची घटना पिंप्राळ्यात घडली .
आज यंदाच्या पहिल्या पावसाचे शहर आणि परिसरात आगमन झाले . जवळपास अर्धा तास पाऊस सुरु होता . या पावसामुळे शहरात अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता . त्यातच पिंप्राळा परिसरातील मढी चौक भागात सायंकाळी विद्युत खांबाचा शॉक लागून गाय दगावल्याची घटना घडली . ही गाय राजेंद्र पाटील यांच्या मालकीची होती असे सांगण्यात आले . गाय दगावल्याची लक्षात आल्यावर मढी चौकात नागरिकांची गर्दी झाली होती या खांबामुळे आणखी काही दुर्घटना घडू नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत होते . महावितरणला स्थानिक रहिवाशांनी या घटनेची माहिती दिली होती.