जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या पार्किंगमधून शिक्षकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
अनिल पांडूरंग दांडगे (वय-४१) हे फॉरेस्ट कॉलनी येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते शिक्षक आहेत . ९ जूनरोजी दुपारी मोटारसायकल क्रमांक (एमएच१९ के ८९९९) ने जिल्हा शासकीय रूग्णालयात कामानिमित्त आले होते. त्यांनी त्यांची १० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल जिल्हा रूग्णालयातील गेट नंबर दोनमध्ये पार्किंग मध्ये लावलेली होती. दुपारी काम आटोपून अनिल दांडगे हे मोटारसायकल जवळ आले असता त्यांना मोटारसायकल दिसून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतू मोटारसायकल कुठेही आढळून आली नाही. ११ जूनरोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना राजेश पदमर करीत आहेत.