पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुकयातील एका गावात मागील भांडणावरून महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
जळगाव तालुक्यातील एका गावात ४५ वर्षीय महिला कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतात काम करून उदरनिर्वाह करते. ११ जून रोजी महिला घरी असतांना दिपक रविंद्र हिवरे, मंगल रविंद्र हिवरे आणि सोनी रविंद्र हिवरे या तिघांनी मागील भांडणाचे कारणावरून महिलेशी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करून अंगावरील साडी ओढून विभयभंग केला. जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ विजय भोई करत आहेत.