जळगाव ( प्रतिनिधी ) – कात्रज ( पुणे ) येथे निसर्गोपचार तज्ञ डॉ .स्वागत तोडकर यांचे मोफत घरगुती निसर्गोपचार पद्धतीने निरोगी आयुष्य कसे जगावे ? या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्यांचा सर्व शक्ती सेनेकडून सत्कार करण्यात आला.
त्यांनी घरगुती पद्धतीने अनेक आजारावर उपचार करण्याबाबत निरोगी व आरोग्यदायी आयुष जगण्या बाबत मार्गदर्शन केले.त्या प्रसंगी राज्यातुन हजारो स्त्री पुरुष उपस्थित होते. त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबदल सर्व शक्ती सेनेचे राज्य अध्यक्षप्रा. संजय मोरे ( अण्णा ) व जळगाव जिल्हा अध्यक्ष कृष्णा सावळे यांनी त्यांचा सत्कार केला.
लोकांनी त्यांना प्रश्न विचारले की शुगर, दमा, कॅन्सर, लखवा हा रोग आपण बरा करू शकतात? हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, 100 % इलाज आहे. जळगाव येथील रूपाली चौधरी यांना ४ वर्षांपासून त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्यासमुळे लखवा झाला त्यांना चालता येत नाही त्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्यांनाही डॉ तोडकर यांनी मार्गदर्शन केले.