जळगाव ( प्रतिनिधी ) – MBBS, BDS, BAMS, BUMS, BHMS, पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) (राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा) देणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि विद्यार्थ्यांची तारांबळ होते योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुप व राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमांतून NEET परीक्षेबाबत एकदिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
NEET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नावाजलेल्या लातूर-नांदेड पॅटर्नचे बोटनी गोल्ड मेडलिस्ट जितेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या कार्यशाळेत 10वी 12वी च्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठी पात्रता, अभ्यासक्रम, पुस्तके, नीटचा अभ्यास कसा करावा, नीट इन्स्टिट्यूट, नीट नंतरच्या करियर संधी ई. विषयांवर माहिती मिळणार असून विद्यार्थ्याना त्यांच्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्याची संधी देखील प्राप्त होणार आहे.
12 जून रोजी सकाळीं 11 ते दुपारी 2 या वेळेत नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे ही कार्यशाळा होणार आहे
हा कार्यक्रम सर्वांसाठी निःशुल्क असल्यामुळे, 10वी 12वी च्या जास्तीतजास्त विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहून फायदा घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.