सातारा (वृत्तसंस्था) – जिल्ह्यातील ८२ संशयितांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर विविध ठिकाणी ७४ संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ५६, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील २५, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील १ अशा एकूण ८२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
तसेच काल बुधवारी दि. २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात २०, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ५४ अशा एकूण ७४ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.