• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विधान परिषदेसाठी शिवेसना, भाजप, काँग्रेसकडून उमेदवार जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 8, 2022
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्यात 10 जून रोजी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. विधान परिषद निवडणुकीचे वारेही आता वाहू लागले आहेत. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. शिवसेनेकडून दोन आणि काँग्रेसकडून दोन उमेदवारांची नावं जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीकडूनही दोन उमेदवारांची नावं जाहीर होतील.
विधान परिषदेच्या एकूण 10 जागा रिक्त होत आहेत. त्यापैकी 9 आमदारांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. तर एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपला आहे. सध्याच्या राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. त्याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी होतील. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. काँग्रेसला अजून एका जागेसाठी म्हणजेच 10 व्या जागेसाठी अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 10 व्या जागेवर भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच होणार आहे.

. विधान परिषदेत एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 27 आमदारांची मतं मिळणं गरज आहे. भाजप आणि अपक्ष मिळून भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यानुसार भाजपचे 4 उमेदवार सहज निवडून येतील. महाविकालस आघाडीकडे एकूण 169 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यानुसार शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार सहजरित्या निवडून येऊ शकतो. पण काँग्रेसनं 10 व्या जागेसाठी उमेदवार दिलाय. त्यामुळे या 10 व्या जागेवर काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळू शकतं.

भाजपकडून विधान परिषदेसाठी विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि उमा खापरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील दरेकर, लाड, भारतीय आणि शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला आहे. उमा खापरे यांचा अर्ज उद्या सकाळी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्या ऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलेले आणि आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विजयात मोठा वाटा असलेले सचिन अहिर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलीय. आदिवासी नेते आमशा पाडवी यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. या दोघांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.


 

Tags: #mumbai #maharashtra #bharat
Previous Post

तरूणाला विनाकारण मारहाण

Next Post

महानगरपालिकेची स्त्री संसाधन केंद्र समिती जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महानगरपालिकेची स्त्री संसाधन केंद्र समिती जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon