जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील ऐतिहासिक पारोळा किल्ल्याची दुरावस्था दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 7 जूनरोजी एक बैठक बोलावली . या किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाला कृती आरखडा तयार करण्याचे, किल्ल्यात अस्वच्छता अन् गैरकृत्य करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे जळगावचे समन्वयक प्रशांत जुवेकर, कु. रागेश्री देशपांडे, पो नि रामदास वाकोडे, तहसीलदार अनिल गवांदे, नगर परिषद मुख्याधिकारी जयश्री भगत, डॉ. अभय रावते आदी उपस्थित होते.
किल्ल्याची डागडुजी करून भिंतीवर उगवलेली झाडे काढणे, किल्ल्याची आतून, तसेच परिसराची स्वच्छता , गटाराची व्यवस्था , किल्ल्यावर मद्यपान, जुगार आदी अवैध धंदे करणार्यांवर कारवाई , करण्यास सांगितले आहे. पारोळा किल्ल्याची दुरावस्था लक्षात आल्यावर आमदार चिमणराव पाटील यांसह काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांचीही भेट घेतली होती. त्याला जिल्हाधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.