• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कोसला फाउंडेशनतर्फे जळगावात ‘कला संजीवनी’ चित्रप्रदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

कलेच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा देणारा उपक्रम प्रेरणादायी – जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन

जळगाव (प्रतिनिधी) – येथील कोसला फाउण्डेशनच्या माध्यमातून थॅलेसेमिया ग्रस्त चिमुकल्यांच्या ‘कला संजीवनी’ चित्र प्रदर्शनीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.व्यासपीठावर डॉ.राधेश्याम चौधरी आणि डाएटचे माजी प्राचार्य नीळकण्ठ गायकवाड,चोपडा येथील कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र महाजन उपस्थित होते.


थॅलेसेमिया रुग्णांवर कोसला फाउण्डेशनच्या माध्यमातून उपचार उपलब्ध करून देणा-या डॉ.सई नेमाडे यांच्या सोबत आपण सर्वांनी या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या कामात लक्ष घातले पाहिजे असे अशोक जैन यांनी सांगितले.पंधरा वर्षापूर्वी एका थॅलेसेमिया ग्रस्त व्यक्तीसाठी सर्वांनी मिळून काही एकत्रितपणे प्रयत्न केल्याची आठवण त्यांनी सांगितली.
जळगाव शहरात-जिल्ह्यात कोसला फाउण्डेशनच्या माध्यमातून ‘थॅलेसेमिया’ विषयात प्रख्यात डॉक्टर आणि संबंधित अत्याधुनिक यंत्रणा आता उपलब्ध असल्याने वेळच्यावेळी तपासणी आणि उपचार या प्रक्रियेत कुठेही,कोणत्याही स्वरूपाची अडचण येऊ नये यासाठी भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाउण्डेशन,कांताई नेत्रालय तसेच गांधी रिसर्च फाउण्डेशनच्या सहकार्याने या कार्यासाठी भविष्यात निश्चितच सहकार्य केले जाणार आहे.लवकरच एका कृतिकार्यक्रमाची रूपरेषा ठरवून या कामाला गती देण्याचे आश्वासन अशोक जैन यांनी दिले.चिमुकल्यांनी blood transfusion सुरू असताना तन्मयतेने चित्रं काढल्याबद्दल थॅलेसेमिया ग्रस्त चिमुकल्यांच्या चित्रांचे त्यांनी आवर्जून कौतुकही केले.कलेच्या सान्निध्यात मनावरचा ताण कमी होऊन चांगल्या कामाशी एकाग्रतेने जोडले जाणे ही खरी जीवन संजीवनी असल्याचेही त्यांनी सांगितले.


डॉ.राधेश्याम चौधरी यांनी आणि प्राचार्य नीळकण्ठ गायकवाड यांनीही कलेतून विद्यार्थी कसे अभिव्यक्त होतात याविषयी काही दृष्टांत-दाखले देऊन मार्गदर्शन केले.प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी चिमुकल्यांच्या भावविश्वातील सुंदर कलेला प्रोत्साहन देणा-या डॉ.सई नेमाडे यांच्या ‌परिश्रमाविषयी आदर भावना व्यक्त केल्या. कोसला फाउण्डेशनच्या कामाची प्रशंसा केली आणि या चिमुकल्यांसाठी आम्ही कलावंत आमचा वेळ देणार आहोत,त्यांच्या आयुष्यातील आशेची पणती तेवती ठेवण्याचे काम आपल्या सर्वांचे असल्याचे सांगून सहकार्याचे अभिवचन दिले.व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते आणि उपस्थित राजू बाविस्कर,जितेंद्र सुरळकर,सचिन मुसळे,विजय जैन या कलावंतांच्या शुभहस्ते प्रदर्शनीत सहभागी विद्यार्थ्यांचा गिफ्ट देऊन स्नेहपूर्वक गौरव करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांना तुळशीचे रोप आदरपूर्वक भेट देण्यात आले.प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सई नेमाडे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.
भारतात आणि परदेशात विज्ञानाने सिद्ध केले आहे की संगीत आणि कला यामुळे सकारात्मकता वाढते आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. विशेषतः ज्या आजारांवर औषधे घेत असतो त्याचा परिणामदेखील अधिक चांगल्या पद्धतीने होतो.पालकांनी त्यांनी नमूद केले. युरोप येथील एका चित्र स्पर्धेसाठी या प्रदर्शनातील चित्रं पाठवली जाणार असल्याची माहिती डॉ.सई नेमाडे यांनी दिली.
‘कला संजीवनी’ चित्र प्रदर्शनीत थॅलेसेमिया ग्रस्त चिमुकल्यांची 40 चित्रं प्रदर्शित झाली असून ही प्रदर्शनी ‘भाऊंचे उद्यान’ येथील वानखेडे कला दालनात दहा तारखेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली.जास्तीतजास्त रसिकांनी या प्रदर्शनीला भेट द्यावी हे विनम्र निवेदन डॉ.सई नेमाडे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता केशव स्मृती प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले.


 

Tags: #JALGAON #JAIN GROUP @JAIN SAMUH
Previous Post

जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने जैनच्या आस्थापनांमध्ये वृक्षारोपण भाऊंच्या उद्यानात नागरिकांसाठी मोफत रोपवाटप; ५०० हून अधिक जणांनी घेतला लाभ

Next Post

पत्रकाराचा मोबाईल तिघांनी लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पत्रकाराचा मोबाईल तिघांनी लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon