वरखेडी ता पाचोरा (वार्ताहार) – वरखेडी भोकरी यागावा पासून दहा किमी अंतरावर असलेल्या पाचोरा शहरात कोरोंनाचा रुग्ण सापडल्याने वरखेडी भोकरी करांनी दक्ष होत आज दि ३०/०४/२०२० गुरुवार रोजी स्व्यंफुर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला त्याला आज उस्फूर्त प्रतिसाद मिळाला पूर्ण गावात नागरिक घरीच बसले ब पाचोरात शहरात रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमी गाव बंद ठेवण्याचा स्व्यंफुर्ती ने जनता कर्फ्यू घेतलेला निर्णयाची आज शंभर टक्के अमल बजावणी दिसून आली गावातील मुख्येरस्ते बाजार पेठ गावातील मुख्येचौक सामसुम पाहाला मिळाला फक्त दवाखाने व मेडिकल व ठराविक दूधडेअरी सुरू होते मात्र तेथे आवश्यक वैद्यकीय कारणासाठीच लोक आलेले दिसून आले तर काही बँक मध्ये पैसे घेण्यासाठी दिसेल. यावेळी पोलिस पाटील वरखेडी बू वरखेडी खू भोकरी ग्रामविकास आधिकारी वरखेडी भोकरी सरपंच उपसरपंच वरखेडी भोकरी गावात फिरून जनजागृती करून सहभाग नोदंवला होता व घरात रहा सुरक्षित रहा