जळगाव ( प्रतिनिधी ) – अयोध्यानगरातील घराच्या बाथरूममध्ये ४६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे मृत्यूचे नेमके कारण लगेच समजू शकले नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शहरातील अयोध्या नगरातील लिलापार्क अपार्टमेंटमध्ये क्षमेंद्र अरुण कुलकर्णी (वय- ४६, रा. लिलापार्क, मनूदेवी मंदिरासमोर, अयोध्यानगर, मुळ रा. अमळनेर) कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. ते अशोक लेल्यांड कंपनीत सुपरवायजर होते. त्यांच्या सासूबाईंचे निधन झाल्याने त्यांची पत्नी व दोघ मुली चंद्रपूर येथे गेल्या होत्या. आज त्या घरी येण्यासाठी निघाल्या होत्या.
दरम्यान, क्षमेंद्र यांची बहिण त्यांना फोन करीत होत्या. परंतु क्षमेंद्र हे फोन उचलत नसल्याने त्यांनी शेजारच्यांना फोन करुन क्षमेंद्र यांच्याबाबत विचारणा केली. शेजारच्यांनी त्यांचा दरवाजा बंद असल्याचे सांगितले. त्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतरही आतून कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा शेजार्यांची एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषीत केले. एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.