• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नेपाळ आंतरराष्ट्रीय परिषदेत शंकर भामेरे , हरिभाऊ राऊत यांचा डंका ; पारावरच्या शाळेचा जगभरात गौरव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जामनेर ( प्रतिनिधी )  – नेपाळची राजधानी काठमांडूतील त्रिभुवन विद्यापीठात आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय ‘इंग्लिश लैंग्वेज टीचर्स अँड अप्लाइड लिंग्विस्टिक ‘ परिषदेमध्ये पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख शंकर भामेरे यांनी शोधनिबंध सादर केला हरीभाऊ भानुदास राऊत यांनी परिषदेत सक्रिय सहभाग नोंदविला .

हा शोध निबंध २८ आणि २९ मेदरम्यान काठमांडू येथे या परिषदेत शंकर भामेरे यांनी ‘टीचिंग इंग्लिश ड्यूरिंग पेंडॅमिक सिच्युएशन ‘ या विषयावर सादर केला .
२०१९ आणि २०२० या शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित सुरू राहावे , या ध्येयाने शंकर भामेरे यांनी जिवाची पर्वा न करता शासकीय नियमांचे पालन करीत लेले नगर येथील हनुमान मंदिरात कुठलाही मोबदला न घेता शाळा भरविली . १८ महीने ही शाळा सुरू होती .या शाळेतून विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या अध्यापनासह कोरोना निर्मूलनासाठी सामाजिक जागृतीचे कार्य केले . टप्प्याटप्याने १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पारावरच्या शाळेचा लाभ घेतला होता .

काठमांडू येथील त्रिभुवन विद्यापिठात शंकर भामेरे यांनी या पारावरच्या शाळेचा प्रकल्प पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सादर केला . हरिभाऊ राऊत यांनी परिषदेत सहभाग नोंदविला . विद्यापीठातर्फे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा . डॉ . गोपाल पांडे , प्रा . भावना , प्रा. लीना हैद , प्रा . डॉ . जोसेफ निकोलस , डॉ . लक्ष्मण गुणवली आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .

शंकर भामेरे यांनी बसस्थानकावर चहा विकून शिक्षण घेतले आहे . हरिभाऊ राऊत यांनी दुकानावर , शेतात मजुरी करत उच्च शिक्षण घेतले आहे . त्यांचा संघर्षमय प्रवास तरुणांना प्रेरणा देणारा आहे .
यापूर्वीही शंकर भामेरे यांनी इंडिया – बांगलादेश टेली कोलॅबोरेशन प्रोजेक्ट , इन्डो – कॅनेडियन इंटरनॅशनल कॉन्फरन्स सह विविध राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत . त्यांना शिक्षणाधिकारी डॉ . नितीन बच्छाव , शिक्षणाधिकारी विकास पाटील , तत्कालीन गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे , महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे , इंग्लिश टिचर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रा . भरत शिरसाठ , मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे , हरिभाऊ राऊत आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले . त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे .


 

 

Tags: #jamner #pahur #maharashtra #bharat
Previous Post

पालकमंञी गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नशिराबाद , भागपूरात 192 नविन रेशन कार्ड वाटप

Next Post

खरीप पिकविमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात ; अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खरीप पिकविमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात ; अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
क्राईम

हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांची फसवणूक; मुख्य आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जेरबंद

October 20, 2026
शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान
खान्देश

शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान

October 20, 2026
जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!
जैन कंपनी

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026
पहूर परिसरात भरधाव डंपरची कारला धडक; सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल
क्राईम

पहूर परिसरात भरधाव डंपरची कारला धडक; सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

October 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाखांची फसवणूक; मुख्य आरोपी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जेरबंद

October 20, 2026
शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान

शिव कॉलनी परिसर मित्र मंडळ : नवरात्री उत्सवात ६५ जणांचे उस्फूर्त रक्तदान

October 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon