जळगाव ( प्रतिनिधी ) – नेरुळचे सुपुत्र, लायन हार्ट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी मुंबई भूषण पुरस्काराने नुकतेच मुंबई प्रेस क्लब येथे सन्मानित करण्यात आले.
अखिल भारतीय मानव विकास परिषद व आदर्श मुंबई प्रेसच्या वतीने आयोजित दहाव्या वर्धपन दिनाच्या प्राइड ऑफ इंडिया पुरस्कार 2022 कार्यक्रमात प्रकृती, संस्कृती, अन्नदाता, जलविज्ञान , वृक्ष , दिप या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. विरेंद्र म्हात्रे यांना नवी मुंबई भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विरेंद्र म्हात्रे यांनी साडेचार वर्षांच्या कालावधीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून कार्याचा ठसा देश व विदेशातही उमटवला आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मराठी बिग बॉस फेम व आगरी बप्पी लहरी संतोष चौधरी , मुबंई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग संप्रा, दै. आदर्श मुंबईचे संपादक संजय भोईर यांच्या हस्ते विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे यांना नवी मुंबई भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले.