जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील महात्मा गांधी मार्केट समोरील चाहाच्या टपरीतून १ लाख ७५ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिका लिंगा गवळी (वय-३८) हे . दालफळ गवळी, शनिपेठयेथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांची महात्मा गांधी मार्केट समोर चहाची टपरी आहे १ जून रोजी सायंकाळी ते त्यांच्या चहाच्या टपरीजवळ उभे असतांना चार अनोळखी व्यक्ती आले. त्यापैकी एकाने चहाच्या टपरीत ठेवलेल्या बॅगेतून १ लाख ७५ हजाराची रोकड लांबविली. हा प्रकार लक्षात आल्यावर भिका गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. २ जून रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना योगेश बोरसे करीत आहेत.