जळगाव ;-तालुक्यातील शिरसोली येथे आज समाजसेवक गुरूप्रितसिंग चहल यांच्यातर्फे येथील १२ गरजू कुटुंबियांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या किराणा साहित्यात गहू , तांदूळ ,तेल ,मिरची मसाला, साबण ,मसाले आदी विविध जीवनावश्य्क साहित्याचा समावेश आहे. या किराणा साहित्य वाटपावेळी कुटुंबातील व्यक्तींनी समाधान व्यक्त केले . वाटपप्रसंगी माजी उपसरपंच शेनफडू पाटील, माजी सरपंच अनिल पाटील,भगवान पाटील, उमाजी पानगळे, शंकर महाजन आदी उपस्थित होते .