जळगाव ( प्रतिनिधी ) – दुकान चालवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे म्हणत एमआयडीसीत चहा नाश्ताची गाडी लावणाऱ्या विक्रेत्याला दोन जणांनी चाकूने भोसकून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अयोध्या नगर येथील रहिवासी शिवनाथ आसाराम शिंदे (वय-35) हा एमआयडीसीतील व्हि- सेक्टर येथे हेरम्स कंपनी जवळ नाश्ता तसेच चहा विक्री गाडी लावतो. त्यावर उदरनिर्वाह भागवतो. १ जून रोजी सायंकाळी राहुल रामचंद्र बराटे व गणेश अर्जुन कोळी हे दोघेही शिवनाथ शिंदे याच्या गाडीजवळ आले. दुकान चालवायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणत त्यांनी शिवनाथ शिंदे यांच्याकडे पैशांची मागणी केली. शिंदे याने पैसे देण्यास नकार दिला असता गणेश कोळी याने शिवनाथ यास पकडून ठेवले तर राहुल बऱ्हाटे याने शिंदे यांच्यावर चाकूने वार करत जखमी केले. त्यानंतर शिवनाथ शिंदे यांची गाडी पलटी करून नुकसानही केले. जखमी शिवनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुल बऱ्हाटे व गणेश कोळी यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील हे करीत आहेत.