“जळगाव :- लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून प्रिंट मिडीया, ईलेक्ट्रानिक मिडीया, फोटोग्राफर्स, दुसऱ्या फळीत काम करणारे कर्मचारी, पेपर्स विक्रेते, वाटप करणारी यंत्रणा अहोरात्र अथकपणे अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत जीवावर उदार होऊन काम करीत आहेत.
देशात कोरोनाच्या संसर्गाची व्याप्ती झपाट्याने वाढत असतांना त्याविरोधातील लढाईसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचली आहे. या लढाईत पत्रकारांची भूमिका खूपच मोलाची आहे.
कोरोनाच्या जनजागृती पासून ते शासन राबवित असलेल्या अनेकविध शासकीय उपक्रमांची अद्यावत माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करीत आहेत.
मिडीया च्या माध्यमातून जनतेपर्यंत अचूक माहीती जात असल्याने कोरोनामुळे निर्माण झालेल्या भितीदायक वातावरणात काही अंशी सहजता आली आहे.त्यांच्या पत्रकारितेमुळे समाजात निर्माण झालेला समन्वय, सामजस्य हे कोरोनाविरूध्दचे युद्ध जिंकण्यासाठी निर्णायक ठरते आहे. देशवासियांचे भावनिक व मानसिक बळ वाढविण्याचे काम पत्रकार करीत आहेत.
“रेडक्राँस” तर्फे नाविन्यपूर्ण फिरता दवाखाना प्राथमिक आरोग्य तपासणी उपक्रम गेल्या एक महिन्यापासून जळगावच्या विविध क्षेत्रात राबवित आहे आजवर या उपक्रमात 4276 रुग्णांची मोफत तापसणी त्यांन्हा मोफत औषधपचारही करण्यात आला आहे.
आज गोलाणी परिसरातील सर्व प्रिंट, ईलेक्ट्रानिक मिडीयातील पत्रकार, फोटोग्राफर्स, प्रेसमध्ये काम करीत असलेले कर्मचारी यांची रेडक्राँसच्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात एकूण 131 कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. या तपासणी अंतर्गत कोरोना पार्श्वभूमीवर संसर्गाचा पूर्व इतिहास, त्याची शक्यता ,अत्यंत धोकादायक व प्रतिकूल परीस्थितीत काम करीत असतांना घ्यावयाची काळजी, पथ्ये इ.बाबत समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले. आज च्या उपक्रमात दैनिक देशोन्नती, दैनिक पुण्यनगरी, दैनिक सकाळ, दैनिक लोकमत,दैनिक बातमीदार,दैनिक तरुण भारत, दैनिक साईमत तसेच विविधी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. मिलिंद कुळकर्णी, राहून राहनकर, सचिन जोशी, अनिल पाटील, दरडकर, हेमंत पाटील, प्रदिप गायके या सर्वांनी सहकार्य केले.
या उपक्रमात जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी व्हावे व आपली प्राथमिक आरोग्य तापसणी करून घ्यावी असे आवाहन रेडक्राँसचे पदाधिकारी श्री. गनी मेमन,विनोद बियाणी, डॉ. प्रसान्नकुमार रेदासनी, राजेश यावलकर, सुभाष साखला,जे. टी. महाजन यांनी केले आहे.
या उपक्रमात रेडक्रॉस तर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. सोनवणे, डॉ. ए. एम. चौधरी, जनसंपर्क अधिकारी श्री. स्वप्नील वाघ. तसेच रेडक्रॉसचे स्वयंसेवक इरफान खान, अनिल पाटील, शीतल शिंपी यांनी कामकाज पाहिले.