जळगाव ( प्रतिनिधी ) – भादली-जळगाव अप रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केली. शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
भादली-जळगाव अप लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४२२-१० जवळ एका अंदाजे ४७ वर्षीयी अनोळखी पुरूषाने १ जून रेाजी सायंकाळी कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस खाली आत्महत्या केली मयताची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी धाव घेतली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. लोको पायलट एम.पी. जोशी यांनी दिलेल्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पो ना मनोज येऊलकर करीत आहेत.