रावेर ( प्रतिनिधी ) – तरूणी घरात एकटी असतांना घरात घुसलेल्या व्यक्तीला हटकले. या रागातून आरोपीने तरूणीसह दोन जणांवर विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना कर्जोद येथे घडली आहे. तरूणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ज्योत्स्ना राजकुमार ससाणे ( रा. कर्जोद ) ही तरूणी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १ जून रोजी तरूणी एकटी घरात असतांना त्याच गावात राहणारा अनिल रमेश ससाणे (वय-२९) हा घरात घुसला होता. अनिल घरात आल्याचे पाहून तरूणीने त्याला शिवीगाळ करून हाकलून दिले. याचा राग असल्याने अनिल ससाणे याने लोखंडी विळ्याने वार करून तरूणीला जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी घरातील रमाबाई ससाणे आणि गौतम ससाणे हे आवरण्यासाठी आले असता त्यांना देखील जखमी केले तरूणीच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अनिल ससाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली पुढील तपास पो उ नि विशाल सोनवणे करीत आहेत.