जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला लोखंडी आसारी डोक्यावर मारून गंभीर जखमी केल्याची घटना देवकर महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावर घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
योगेश घनश्याम पाटील (वय-३५) हे शिरसोली येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी दुपारी योगेश पाटील दुचाकीने देवकर महाविद्यालयाच्या मागे रस्त्यावरून जात होता. त्यावेळी रविंद्र लक्ष्मण बुंदे ( रा. शिरसोली ) व त्याच्या सोबत इतर अनोळखी तीन जण यांनी योगेश पाटील यांची दुचाकी अडवली. मागील भांडणावरून रवींद्र बुंदे याने हातातील लोखंडी आसारी योगेश पाटील यांच्या डोक्यात टाकून दुखापत केली सोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी पायावर लोखंडी पाईपने मारहाण केली. जखमी योगेशला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात रवींद्र बुंदे यांच्यासह अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो हे कॉ जितेंद्र राठोड करीत आहेत .